भीमजयंती उत्सव आपअपल्या घरीच साजरी करा - हारिदास शेलार
पाटोदा (प्रतिनिधी ) - 14 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला आपापल्या घरातच पुष्पहार अर्पण करून व बुद्धवंदना घेऊन मोठया उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करायची आहे.तसेच कोणीही सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर यायचे नाही.
रात्री ८ वाजता सर्व भीम अनुयायांनी आपल्या घरी ५ मेणबत्त्या लावून पंचशील आचरण करून बुद्ध-भीमाला वंदन करायचे आहे.
जगाला माहिती आहे आंबेडकरी अनुयायी लाखो संख्येने एकत्र येऊन भीम जयंती साजरी करत असतात आणि हीच वेळ आहे जगाला दाखवून देण्याची की, आंबेडकरी जनता शिस्त प्रिय व कायद्याचे पालन करणारी आहे.
त्यामुळे सर्वांनी अति उत्साहात आपल्याच घरी जयंती साजरी करायची आहे. व प्रत्येकाने अगोदर स्वतः ची व समाजाची जबाबदारी घेऊन जगावर आलेल्या कोरोना अशा भयानक रोगाचा मुकाबला करून कोरोनाला हरवायचे आहे असे शिवमावळाचे बीड जिल्हा प्रतिनिधी हरिदास शेलार यांनी आवाहन केले आहे.