परळी तालुक्यातील शेतकर्यांची धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर गर्दी
परळी - लॉकडाऊनमुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेले आहेत. त्यामुळे परळीतील शेतकरी मोठ्या आशेने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पहात आहेत. धनंजय मुंडे हे देखील या शेतकर्यांना वार्यावर सोडत नसून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यातून मार्ग काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. धनंजय मुंडे सध्या करत असलेले काम शेतकर्यांना खरोखरच दिलासा देणारे आहे.
बीडचे जिल्हाधिकारी यांनी मार्केटमध्ये गर्दी होऊ नये यासाठी भाजीवाले व शेतकर्यांचे नियोजन करून त्यांना एरिया प्रमाणे विभागणी करून त्या त्या विभागात ठरवून दिलेल्या शेतकर्यांनी आपल्या भाज्या फळे विक्री करावी. यासाठी आजपासून प्रत्येक तालुक्यात भावाचे फलक निश्चित केले आहे. मात्र अनेकांना अशाप्रकारे माल विकण्यास अडचण येत असल्याच्या कारणावरून काही शेतकर्यांनी सकाळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयासमोर गर्दी करून त्यांचा माल विकत घ्यावा, अशी मागणी केली. त्यानंतर जवळपास 100 च्या आसपास शेतकरी आपला भाजी पाला घेऊन धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयासमोर जमले होते.
या कठीण परिस्थितीत मार्ग काढत धनंजय मुंडे यांनी जमलेल्या वयोवृद्ध शेतकर्यांना बसून विकण्यास परवानगी दिली असून बाकीच्या भाजी फळ विक्रते यांना गल्लो गल्ली जाऊन फिरणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे.धनंजय मुंडे शेतकर्यांच्या अडचणी सोडवत असताना सोशल डिस्टन्स पाळत असल्याचेही दिसून येत आहे.