गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने बीड शहरात नागरिकांची तपासणी - विलास बामणे
बीड- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने बीड शहरातील नागरीकांची गेल्या आठ दिवसांपासून आरोग्य तपासणी सुरू आहे. बीड शहरातील पेठ बीड भागात गांधी नगर,शास्त्री नगर,गजानन नगर, बलभीम नगर, एकता नगर,इस्लामपुरा,रामतीर्थ,रमाई नगर,पावरलूम, हनुमान नगर,खंडेश्वरी परिसर,रामतीर्थ,आयोध्या नगर, शुक्रवार पेठ, तकवा काँलनी, फकिरवाडा आठ दिवसांत ३००० कुटुंबाची म्हणजेच २५००० वर नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यावेळी जिल्हा आरोग्य समिती सदस्य डॉ.लक्ष्मण जाधव,विक्रांत हजारी,भगिरथ बियाणी,अजय सवाई,विलास बामणे,दत्ता परळकर, अमोल वडतीले,आरोग्य परिचारिका जाधव ताई, कदम ताई ,काकडे,फड,प्रशांत सानप,अशोक खिल्लारे आदींसह आरोग्य विभागाची टीम उपस्थित होती.