कोरोना विषाणू संसर्ग झालेला रुग्ण आढळल्याने पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित
बीड- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे इतर ठिकाणी याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी फौजदारी दंड संहिता 1973 कलम 144 नुसार पिंपळा गावापासून तीन किलोमीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता परंतु काल एक रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळा येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्याच्या आजूबाजूची गावे यामध्ये तीन किलोमीटरचा परिसर सुंबेवाडी ,धनगरवाडी ,काकडवाडी ,ढोबळ सांगवी व खरड गव्हाण हा परिसर कंटेनमेंट झोन (containment zone) म्हणून घोषित केला आहे. गावाच्या रस्त्याच्या सीमा जेसीबी ने माती टाकून बंद करण्यात आल्या आहेत. याचा नंतरचा पुढील चार किलोमीटर चा परिसर लोणी , नांदूर , सोलापूरवाडी , खुंटेफळ कोयाळ हे गावे बफर झोन (buffer zone) म्हणून घोषित करण्यात येत आहे . वरील सर्व गावे व परिसर पुढील अनिश्चित काळासाठी पूर्ण वेळ बंद करण्यात येत असून संचारबंदी लागू केली आहे. असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले आहे.