पोलिसांच्या आशीर्वादाने चिकन दुकाने उघडी

पोलिसांच्या आशीर्वादाने चिकन दुकाने उघडी


मीरारोड- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील सर्व चिकन मटण दुकाने ३ दिवस  बंद ठेवण्याचे आदेश मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिले आहेत असे असतानाही आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत  मीरारोडच्या सिनेमॅक्स जवळील भागात दुकानदारांनी पोलीस कर्मचारी व पालिका अधिकारी यांच्या आशीर्वादाने चिकन दुकाने उघडी ठेवून खुलेआम चिकनची विक्री करत असल्याचे आढळून आले असतानाही मीरारोड पोलीस मात्र याकडे जाणीव पूर्व दुर्लक्ष करत आहेत.
           भाईंदर पूर्व परिसरात रविवारी पहाटे चिकन दुकान बंद करण्यास सांगितल्याने पालिका अधिकाऱ्यास मारहाण करण्यात आली असल्याची घटना ताजी असून देखील चिकन मटण दुकाने पोलिसांच्या आशीर्वादाने उघडी असून खुलेआम विक्री केली जात आहे . चिकन खरेदी करत असणारे लोक कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्स पाळत नाहीत.जागरूक नागरिकांनी या बाबत मीरारोड पोलीस ठाण्याला माहिती दिली अथवा कारवाई करण्यास सांगितल्यास पोलीस दिखाव्यापुरते येऊन दुकान मालकाला अटक न करता तेथे काम करणाऱ्या नोकराला कारवाई करता घेऊन जातात व परत काही कालावधी नंतर सोडण्यात येते यामुळे चिकन दुकानदार आणि पोलीस यांच्यात साटेलोटे असल्याने दुकाने चिकन विक्रीसाठी उघडी असतात. गेल्या दोन दिवसांपासून रामदेव पार्क परिसरातील चिकन दुकान उघडे असून आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असून पोलीस किंवा पालिका अधिकारी कोणतीही ठोस  कारवाई करत नसल्याने दुकानदार बिनधास्त पणे मुजोर पणा करत आहेत.यांच्यावर कडक कारवाई का केली जात नाही? मीरारोड पोलीस बघ्याची भूमिका का घेत आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
        मीरा भाईंदर शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाचा आकडा वाढत असूनही नागरिकांच्या गर्दीत फरक पडलेला नसल्याचे दिसून येत आहे.करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय  पालिकेने घेतला होता.मात्र नागरिकांना रोजच्या जीवनात चिकन, मटण खाण्याची लागलेली सवय यामुळे त्यांची गैरसोय होत असल्याने काही दिवसांपूर्वी चिकन व मटण दुकाने उघडण्याची परवानगी मिरा भाईंदर महापालिकेकडून देण्यात आली होती मात्र लोकांची चिकन दुकानांवर होणारी गर्दी बघून आयुक्तनी १४ एप्रिल ते १६ एप्रिल सर्व मटण चिकन दुकान बंद ठेवण्याचा आदेश दिला होता.त्यानुसार सर्व दुकाने बंद करण्यात आली होती .मात्र काही तुरळक मुजोर दुकांनदारानी नियम धाब्यावर ठेवत दुकाने उघडी ठेवल्याचे दिसत आहे.दरम्यान शहरातील चिकन मटणाची दुकाने उघडताच त्यावर दररोज लोकांची रांग बघायला मिळते त्यामुळे जीवापेक्षा चिकन मटण जास्त महत्त्वाचे आहे का असा सवाल पडला आहे .