माणुसकीची भिंत पाटोदा यांच्याकडून गरिबांना किराणा साहित्य वाटप  

माणुसकीची भिंत पाटोदा यांच्याकडून गरिबांना किराणा साहित्य वाटप  
पाटोदा  - कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेले असताना भारतातही खबरदारीचा उपाय म्हणून अख्खा देश लॉक डाऊन करण्यात आला आहे . हे करत असताना सरकारने वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत गोरगरिबांना दिलासा देण्याचा निर्णय घेतलेला आहे थेट मदत पोचण्यासाठी काही कालावधी लागत असल्यामुळे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या पाटोदा तालुक्यातील माणुसकीची भिंत यांनी सामाजिक बांधिलकी दाखवत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अरूण पवार,पञकार दत्ता देशमाने, रामदास भाकरे,युवानेते युवराज जाधव,डॉक्टर सारिका माने माऊली हॉस्पिटल यांच्या पुढाकारातून रोज गावोगावी फिरून भंगार गोळा नंतर विकून पोट भरत असलेल्या मसणजोगी समाजाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखवा म्हणून केलेल्या लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली होती म्हणून माणुसकिची भिंत पाटोदा यांनी दिला मसणजोगी वस्तीला महिना भर पुरेल हेवढा किराणा साहित्य मोफत वाटप करून  दिला आधार तर कोरोनाच्या विषाणू पासून बचाव होवा म्हणून मॉस्क व सॕनिटायझरची वाटप करून माऊली हॉस्पिटलच्या डॉक्टर सारिका माने यांनी कोरोना पासून कसा बचाव करावा यांची माहिती मसणजोगी वस्तीवरील लोकांना दिली आपण ही समाजाचे देणे लागतो या भावनेने फुल ना फुलाची पाकळी म्हणून गरजू कुटुंबांना माणुसकीची भिंतया माध्यमातून अरुण पवार ,दत्ता देशमाने,रामदास भाकरे,युवराज जाधव  पत्रकार गणेश शेवाळे यांनी गरजू कुटुंबांना मदत करण्यात आली  या कार्यास किराणा आवढाळ ( सामाजिक कार्यकर्ते) यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. यापूर्वी देखील पाटोदा तालुक्यात माणुसकीची भिंत या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते.