भावाला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
गेवराई : गेवराई तालुक्यातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यावर अडवून तुझ्या भावाला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. सदरील पीडितेचा पाच महिन्याचा गर्भ खाली केला असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.10 डिसेंबर 2019 रोजी दुपारी बारा वाजता ती शाळेतून घरी येत असताना आरोपी याने भावाला जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. भीतीपोटी पीडितेने आतापर्यंत ही बाब कोणालाही सांगितली नव्हती. परंतु रविवारी तीचे पोट दुखत असल्याने तिला बीड जिल्हा रुग्णालयत उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी ती पाच महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले. तिचा गर्भपात झाला असून तिने दिलेल्या एमएलएसी जबाबावरून पोलीस स्टेशन गु र नंबर 189/ 20 कलम 376 (2)(f),376 (3), 341, 506 भांदवी सहकलम 4,8, 12 पोस्को याप्रमाणे रामेश्वर आत्माराम माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. आरोपी हा पीडितेचा जवळचा नातेवाईक आहे. अटके संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहे. पुढील तपास मपोउनि मनीषा जोगदंड या करीत आहे.