मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी तरुणाचे मीरा भाईंदरकरांना आवाहान 

 


मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी तरुणाचे मीरा भाईंदरकरांना आवाहान 


भाईंदर-  जगभर पूर्ण कोरोना या विषाणु मूळे हाहाकार माजवला असतानाच  पूर्ण देशात लॉक डाउन व संचार बंदी लागू  करण्यात आलेली आहे . संचारबंदीच्या काळात लोक आर्थिक मंदित अडकल्यामुुुळे सरकारने व समाज सेवकांनी अनेक मदतीचे हात पुढे केले आहेत.  रस्त्यावर भटकणारे जे मुके प्राणी आहेत त्यांची आठवण कोणालाच येत नसल्याने भाईंदर मधील एका तरुणाने आता मीरा भाईंदर वासियाना मदतीचे आवाहान केले आहे.
       संचारबंदीच्या काळात रस्ते रिकामे झाले, मार्केट बंद पडली आहेत. मात्र मुक्या प्राण्यांच जीवन रस्त्यावर कुठे काही खायला भेटले तर ते खाऊन चालत असते पण संचारबंदी मुळे सर्व लोक घरात बसले आहेत त्यामुळे याना खायला मिळणे देखील मुश्किल झाले आहे. या भटक्या मुक्या प्राण्यांना अन्न पाणी मिळत नाही. या भटक्या कुत्र्यांना आता खायला काही उरलंच नाही. रस्त्यावरून जाणारे येणारे पूर्वी या भटक्या खायला टाकत होते. या भटक्या कुत्र्यांना अन्न मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे भाईंदर पूर्वला काशीनगर येथे राहणाऱ्या दर्शन या २२ वर्षीय तरुणाने एक पोस्ट तयार करून स्वताच्या व्हाट्सएप द्वारे इतरांना पाठवून त्यात माझ्या मित्रांना माझी एकच विनंती आहे. जर विणाकारण घराबाहेर पडाल तर आपापल्या परिसरातील आजू बाजूच्या भटक्या कुत्र्यांना खायला अन्न जरूर टाका. तुमच विणाकारण फिरण सार्थी लागेल अश्या प्रकारची विनंती करण्यात आली आहे. सर्वांनी आपआपल्या परिसरात असलेल्या ठिकाणी सर्वांनी आपले उरलेले अन्न फेकून न देता यांना खायला दिले तर या स्वानांचे पोट भरेल व अन्न ही वाया जाणार नाही.