लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या परिवारास सोमीनाथ कोल्हे यांची पाच हजाराची मदत

लॉकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या परिवारास सोमीनाथ कोल्हे यांची पाच हजाराची मदत
पाटोदा- कोण कधी अडचणीत येईल सांगता येत नाही ,पण सतत आपल्या सोबत असणारा माणुस अडचणीत आला तर त्याच्या परिवाराच्या कोणत्याही मदती साठी आ. धस यांचे स्विय सहायक कोल्हे सदैव तत्पर असतात , अशीच अर्थिक मदत अडचणित असलेल्या परिवारास केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
    पाटोदा येथिल दिनेश नारायणकर हा हरहुन्नरी तरुण ,कधीही हसत खेळत सर्वांत मिसळणारा आहे .लॉकडाऊनमुळे त्याचा परिवार अर्थिक अडचणीत होता ,पत्नी व मुलिंचे किरकोळ दुखणेही पैसा नसल्याने दाबुन ठेवत होते .घरात आहे त्याच्यवरच जगत होता हा नारायणकर परिवार .याची माहीती आ सुरेश धस यांचे स्विय सहायक मराठी पत्रकार परिषदचे ता.अध्यक्ष सोमीनाथ कोल्हे यांना समजताच तात्काळ दिनेश नारायण कर यांचे घरी जाऊन रोख पाच हजाराची मदत दिनेश नारायणकर परिवारास दिली .सोमीनाथ कोल्हे हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतुन पाटोदा येथे स्थायिक झाले . त्यांना गरीबीची जाण आहे सोमीनाथ कोल्हे यांच्यामुळेच पाटोदा तालुक्यातील गोरगरीबांच्या समस्या आ धस यांच्यापर्यंत तात्काळ पोहचतात .पाटोदा शहरात काही व्यक्तींना सोमीनाथ कोल्हे यांच्यामुळेच अस्तित्व व नाव मिळाले आहे .अनेक गरिब नागरीकांच्या रोटी रोजीचा प्रश्न कोल्हे यांनी मार्गी लावला आहे .म्हणुनच पाटोदा शहरातील कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजण आ धस परिवार सोमीनाथ कोल्हे यांच्याकडे देतात कारण समाजातील तळागाळातील माणसाची नाळ कोल्हे यांच्याशी आहे .दिनेश नारायणकर परिवारास मदत केल्याने त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे .याप्रसंगी पत्रकार हमीद पठाण ,महेश बेदरे ,अजिज शेख ,पोपट कोल्हे,गणेश शेवाळे  उपस्थित होते