कोरोना झालाय म्हणत बौद्ध कुटुंबास घरात घुसुन मारहाण अट्राॅसिटी दाखल करण्याची मागणी

 


कोरोना झालाय म्हणत बौद्ध कुटुंबास घरात घुसुन मारहाण


अट्राॅसिटी दाखल करण्याची मागणी


बीड- तुझ्या घरच्यांना कोरोना झाला आहे असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून बौद्ध कुटुंबास घरात घुसुन मारहाण केल्याची घटना घडली आहे. एकाचे डोके देखील फुटले आहे. हि  घटना धारूर तालुक्यातील देवठाणा गावात सोमवारी ६ एप्रिल रोजी घडली आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात अट्रोसिटी ऍक्टनुसार तिघा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे
  या प्रकरणी ऋषिकेश बंडू व्हावळकर यांनी सिरसाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत सांगितले की गावातील नारायण भगवान काशीद, पप्पू उर्फ जिजासाहेब भगवान काशीद, संतोष मोतीराम सोळंके,सर्व राहणार देवठाणा यांनी संगनमताने घरात घुसून तूझ्या आजी आजोबा मामी मावशी यांना कोरोना रोग झाल्याच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून डोक्यात काठीने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.या मध्ये जिजासाहेब काशीद यांना पोलिसांनी ताब्यात घेतले याचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी श्रीकांत डिसले हे करत आहेत.
या प्रकरनी दुसऱ्या एका घटनेत पप्पू उर्फ जिजासाहेब काशीद यांनी दिलेल्या फिर्यादी त म्हटले आहे की संचार बंदीचे आदेश असताना घरा बाहेर पडून शेतातिल झाडं का तोडता असे विचारताच बाळासाहेब सहजराव, ऋषिकेश व्हावळकर, रंगनाथ सहजराव, ओम सहजराव, रा देवठाणा यांनी संगनमताने शिवीगाळ व काठीने मारहाण करून जखमी केले म्हणून तिघां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास जमादार दिलीप कुरेवाड हे करत आहेत.
कोरोनाच्या आड 'जातीवादाची फुत्कार
कोरोनाचे फक्त निमित्त आहे, ह्या घटने मागे गावगुंडानी जातीवादाची फुत्कार ' मारली आहे . सहजराव कुटुंबीय अथवा कुटुंबातील कोणताही व्यक्ती पुणे  - मुंबई अथवा बाहेरुन आलेला नाही अणि कोरोनाची कोणतेही लक्षणे नाहीत तरीही देवठाण्यातील जातीवादी गावगुंडानी बौद्ध कुटुंबीयांना जनावरा प्रमाणे मारले आहे. हे सहजराव कुटुंबीयी संबधीत आरोपींच्या/ गावगुंडाच्या शेतात कामाला जात नाहीत याचा मनात राग धरुन कोरोनानिमित्त सहजराव ह्या बौद्ध कुटुंबीयांना गावगुंडानी मारहान केली आहे. असे पिडितांनी सांगीतले आहे.