परळीतील हातभट्टी दारू अड्डा उद्धवस्त
परळी - संचार बंदी काळात अवैद्य हातभट्टी दारू अड्डयावर पोलिसांनी कारवाई करून यामध्ये दोन पुरूष व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
परळी शहरापासुन अगदी काही अंतरावर असलेल्या धारावी तांडा येथे दोन पुरूष व एक महिला यांच्या माध्यमातुन संचारबंदी काळात अवैद्य दारू हातभट्टी दारू बनवण्याचे काम धारावी तांडा शिवारातील शासकीय गोदामाच्या पाठीमागे जोरात सुरू असल्याची माहिती गुप्त माहिती द्वारे मिळाली व परळी ग्रामीणचे पि आय पुर्भे यांनी व त्याच्या सहकार्यानी हा हातभट्टी अड्डा उदध्वस्त केला. या इसमा विरूध्द कलम 188, 269, 270 भादवी कलम 65 (ई) (फ) व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 51 (ब)आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 17 मपोक अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. धारावी तांडा हा बीड जिल्हा पालकमंञी धनंजय मुंडे यांच्या तालुक्यात येत असुन अशा अवैध काम करणाऱ्यांवर लक्ष असायला पाहिजे धारावी तांडा येथे पोलिस प्रशासनाच्या वतीने अनेक वेळा कारवाई करून सुद्धा हे अवैध धंदा करणारे डोके वर काढतात यामागचे काय गौडबंगाल आहे हे समजु शकत नाही. परळी ग्रामीण पोलिस व स्थानिक गुन्हा शाखा बीड यांच्या वतीने ही कार्यवाही केली बीडचे एस पी हर्ष पोद्दार,अंबाजोगाई श्रीमती स्वाती भोर,पोलिस निरीक्षक भारत राऊत स्थानिक गुन्हा शाखा बीड,परळी ग्रामीण पोलिस स्टेशनचे पि आय शिवलाल पुर्भे, आनंद कांगणे,सखाराम पवार,गहिनाथ गर्जे, झुंबर गर्जे,संतोष हंगे,गोविंद काळे व इतर कर्मचारी या कारवाईत सहभागी होते.
परळीतील हातभट्टी दारू अड्डा उद्धवस्त