रेशन दुकानातून धान्य मिळण्यासाठी जाचक अटी- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
मुंबई- कोरोनाच्या संकटामुळे पूर्ण देशात केंद्रशासनाकडून सर्व गरीब व गरजूंना रेशन दुकानातून मोफत धान्य दिले जाणार आहे. परंतु रेशन दुकानातून धान्य मिळण्यासाठी काही जाचक अटी राज्य सरकारने घातल्या आहेत आहे त्या रद्द कराव्यात असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली आहे.
आगामी ३ महिन्यांचे धान्य रेशन दुकानातून देताना केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र राज्य सरकारने अनेक अटी टाकल्या आहेत. आधी विकत मिळणारे रेशन घेतले तरच पुढचे धान्य मोफत मिळेल, ज्यांनी नियमित धान्य घेतले, त्यांनाच ते मिळेल, अशा स्वरूपाच्या या अटी आहेत. माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी या अटी मागे घ्याव्यात. आज गरिबांना धान्य मोफत मिळणे अतिशय आवश्यक आहे. रेशन कार्ड असो वा नसो, धान्य देण्याचेच निर्णय अन्य राज्यांनी सुद्धा घेतले आहेत. केंद्रीय नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवेजी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, ३ महिन्यांसाठी आवश्यक धान्यापैकी ९० टक्के कोटा उपलब्ध झाला आहे. उर्वरित २ दिवसात उपलब्ध होईल. त्यामुळे ३ महिन्यांचे धान्य राज्य सरकारने एकत्र द्यावे अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.