बीड शहरातील गोरगरिबांची घरपट्टी,पाणीपट्टी माफ करा :- पप्पुजी कागदे       

बीड शहरातील गोरगरिबांची घरपट्टी,पाणीपट्टी माफ करा :- पप्पुजी कागदे      


जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, बीड पालिकेचे सी ओ. यांना देणार निवेदन                       


बीड- देशावर व जगावर कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत चालला असुन सद्या गोरगरिब लोकांची आर्थीक स्थिती बिघडली आहे. राज्यात कोरोनाची आकडेवारी वाढतच चालली आहे. अजुन किती दिवस या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव राहतो व त्यात हा कोरोना किती लोकांचा बळी घेतो याचा अंदाज कुणालाच नाही परंतु बीड जिल्ह्यात अाजच्या स्थितीला फक्त एक रूग्न जरी असला तरी याच रूग्नांनी बीड जिल्ह्यावर असमानी संकट आल्याच दिसुन आले आहे एकिकडे अडचणीच्या काळात बीड नगरपरिषदेन बीड शहरातील जनतेची पाणीपट्टी,व घरपट्टी माफ करून सहकार्य करावे अशी मागणी युवा रिपाई प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पुजी कागदे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष, बीड पालिकेचे सी ओ. यांना  निवेदन  देणार आहेत.