आ. बाळासाहेब आजबे वैद्यकीय यंत्रसामग्री आणि साहित्य खरेदीसाठी ५० लाखाचा निधी देणार

आ. बाळासाहेब आजबे वैद्यकीय यंत्रसामग्री आणि साहित्य खरेदीसाठी ५० लाखाचा निधी देणार
पाटोदा  : कोरोना प्रतिबंधक उपचारासाठी वैद्यकीय यंत्रसामग्री आणि साहित्य खरेदीसाठी आष्टी , पाटोदा , शिरूर मतदार संघाचे आ . बाळासाहेब आजबे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून ५० लाख रुपये खर्चास मंजुरी देण्याचे पत्र बीड जिल्हाधिकारी रेखावर यांना दिले आहे .कोविड १९ अर्थात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध प्रकारच्या उपाययोजना करत आहे.  संचारबंदी ही त्यापैकी एक . या काळात लोकांची अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू बाबतीत गैरसोय होऊ नये म्हणून अनेक सामाजिक संघटना व सरकारकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. ठिकठिकाणी गरजूंना किराणा व इतर साहित्य वाटप केले जात आहे .आ बाळासाहेब आजबे यांनीही याबाबत तत्परतेने पाऊल उचलत आष्टी , पाटोदा आणि शिरूर येथील अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना सुयोग्य व्यवस्थापनाच्या सूचना केल्या आहेत. सर्व नागरीकांनी घरात बसून राहण्याचे आवाहन केले आहे.