पाटोदा तहसीलदार यांच्याकडून स्व खर्चातुन १५ दिवस पुरेल इतके घर ऊपयोगी किराणा सामान वाटप
पाटोदा - कोरोनाविरोधात अहोरात्र लढाईत सहभाग असलेल्या पाटोदा येथील तहसीलदार सामाजिक कर्तव्यातही आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी कुठलाही गाजावाजा न करता विहीर , दगडफोडीच काम करणाऱ्या अनेक कुटुंबांना स्वखर्चाने पंधरा दिवस पुरेल एवढे धान्य आणि जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या . एखाद्या सरकारी अधिकाऱ्याने अशा प्रकारची मदत देण्याचं जिल्ह्यातील ही पहिली घटना आहे . पाटोद्याचे तहसिलदार रमेश मुनलोड कोरोना लढाईत वरिष्ठ कार्यालयाकडून येणाऱ्या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी अहोरात्र झगडत आहेत. तालुकाभरात फिरताना समाजाच्या तळातील मजुरांच्या हालअपेष्टा त्यांनी जवळून पाहिल्या . तालुक्यात विहिरी खोदकाम करणारे मजूर , जडीबुट्टी विकणारे वैद्य हे गावापासून अंतरावर राहतात . वैद्यकिनी परिसरात त्यांना असे काही कुटुंब निदर्शनास आले त्यांच्यापर्यंत कोणीचीच कसल्याही प्रकारची मदत पोहोचली नसल्याचे लक्षात आले . या लोकांची - उपासमार होऊ नये म्हणून शुक्रवारी मुनलोड यांनी स्वखर्चाने जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या . गहू , तांदूळ , साखर , डाळी , चहा आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला . गटविकास अधिकारी नारायण मिसाळ , मंडळ निरीक्षक बाळासाहेब बडे , सरपंच अतुल मकाळ आदी यावेळी उपस्थित होते .