जमावबंदी व संचारबंदी चे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
भाईंदर - मीरा भाईंदरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात जमावबंदी व संचारबंदी लागू असताना ही नागरिक त्याचे उल्लंघन करत असल्यामुळे नवघर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
मीरा भाईंदरमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पूर्ण शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक नागरिक हे नियमांचे पालन करत आहेत तर काही नागरिक हे नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. काही लोक हे आपली मनमानी करत नियमांचे उल्लंघन करून बाहेर फिरत आहेत. काही नागरिक हे औषधे घेण्याच्या नावाखाली तर काही कुत्रे फिरवण्याच्या नावाखाली बाहेर निघत आहेत. नवघर पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या जवळपास ९० नागरिकांवर नागरिकांवर कारवाई केली. यानंतरही नियम तोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
नागरिक हे या आजाराला गंभीरतेने घेताना दिसत नाहीत त्यामुळे याचा परिणाम वाईट होऊ शकतो. या आजाराला पोलीस व डॉक्टर हे पूर्णपणे लढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु नागरिक जर सहकार्य करत नसतील तर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व त्याचे सर्वानाच वाईट परिणाम भोगावे लागतील. मीरा भाईंदर मध्ये लहान लहान कारखाने व झोपडपट्टी परिसर मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाचे संक्रमण जर पसरले तर मोठी हानी होऊ शकते म्हणून खबरदारी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ही कारवाई नवघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शनानुसार एपीआय रोशन देवरे , एपीआय योगेश काळे , संपतराव पाटील यांनी कारवाई केली.