मोफत गॅसचा बीड जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ग्राहकांना होणार लाभ

मोफत गॅसचा बीड जिल्ह्यात १ लाख ९१ हजार ग्राहकांना होणार लाभ


बीड -  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्व नागरिक घरातच आहेत. अशा स्थितीत संकटात अडकलेल्या गरीब, मजुर व सर्वसामान्य कुटुंबीयांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ३ महिण्यासाठी मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या भारत पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाचा लाभ बीड जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ग्राहकांना होणार असल्याची माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे विभागीय मॅनेजर केतन कर्निक यांनी दिली आहे.
    कर्निक यांनी म्हटले की, कोरोनामुळे संपूर्ण देशात तणावाचं वातावरण आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने काही योजनांची घोषणा केली आहे. यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत दारिद्र रेषेखालील कुटुंबीयांना एप्रिल ते जुन २०२० दरम्यान तीन महिण्यासाठी मोफत सिलेंडर वाटप करण्यात येणार आहे. ३ व ४ एप्रिल पर्यंत सर्व पीएमयूवाय ग्राहकांच्या खात्यावर एका रिफीलचे पैसे जमा होणार आहेत. बीड जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.केंद्र सरकार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्याच्या संबंधित बँक खात्यात पैसे जमा करणार आहे. बँकेत पैसे जमा झाल्यानंतर ग्राहकांना कंपनीकडून मेसेज येईल की तुम्ही सिलेंडर बुकिंग करु शकता. सिलेंडर बुकिंग फक्त रजीष्टर्ड मोबाईलवरुनच करता येईल. ज्या ग्राहकांचा मोबाईल नंबर रजीष्टर्ड नसेल. त्यानी प्रथम आपला मोबाईल नंबर एजन्सी मधे रजीष्टर्ड करून घ्यावा. या तीन महिन्यात फक्त एकदाच मोबाईल रजीष्टर्ड करता येईल. रजीष्टर्ड नंबर वरून बुकिंग झाल्यानंतरच सिलेंडर घरपोच डिलीवरी होईल. सिलेंडर मिळाल्याची नोंद गॅसबुक मधे डिलीवरी बॉय व ग्राहकाच्या सही किंवा आंगठ्याने होईल. या शिवाय सिलेंडर मिळाल्याची घोषणापत्र सही किंवा अंगठा करून घ्यावे लागेल.  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या  लाभार्थी कडुन सिलेंडर मिळाल्याची पोचपावती, घोषणापत्र व गॅसबुकमधे नोंद डिलीवरी बॉईजने ठेवावी, असे त्यांनी सांगितले आहे.


असा घेता येईल लाभ


पीएमयूवाय ग्राहक सिलेंडरचे कॅशमेमोप्रमाणे पैसे जमा करेल.पहिला रिफिल ग्राहकाने वापरला तर त्याला दुसर्‍या महीन्यात सिलेंडर बुक करता येईल अन्यथा नाही त्या साठीही ग्राहकाच्या खात्यावर आधी पैसे जमा होतील व नंतर बुकिंग करुन सिलेंडर घेतां येईल. एका महीन्यात एक प्रमाणे ३ सिलेंडर मिळतील.या फ्री रिफील वर्षाच्या लोन मधे गृहित धरल्या जाणार नाहीत. नंतर नेहमीप्रमाणे ग्राहक सिलेंडर बुक करु शकतो.
कर्मचार्‍यांना पाच लाखाचा वीमा कवच
कोरोना महामारीच्या कठीन परिस्थितीत २१ दिवसाच्या लॉकडाउन दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प पडलेले आहेत. या पार्श्वभूमीवर गॅस वितरण सुरळीत सुरू आहे. याची दखल घेउन भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने जीवावर उदार होऊन सिलेंडर ग्राहकांना घरपोच पुरवठा करीत आहेत.अशा कर्मचार्‍याला दुर्देवाने कोरोना बाधित होऊन मरण आले तर त्याच्या वारसदाराला पाच लाखांचा लाभ देण्यात येणार आहे. गॅस एजन्सीचे डिलीव्हरी बॉय, ऑफिस कर्मचारी, मेकॅनिक, सिलेंडर वाहतुक गाडीचा चालक, ट्रक चालक, रिटेल आउटलेट आदि कर्मचार्‍यांना कंपनी वीमा कवचचा लाभ देणार आहे.
कार्यालयात गर्दी नको, सर्वांना लाभ मिळणार
राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाच्या दिशा-निर्देशानुसार गॅसचा पुरवठा व वितरण करण्यात येत आहे. गैस सिलेंडरचा मुबलक साठा उपलब्ध आहे. ग्राहकांनी पॅनिक होउन सिलेंडर नोंद करण्यासाठी कार्यालयात गर्दी करू नये. बुकिंग फोन व अन्य सुविधांचा वापर करावा. सिलेंडर घरपोच देण्यात येईल. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे आमच्याकडे सर्वाधिक १६ हजार ग्राहक आहेत सर्वांना लाभ देण्यात येईल.
*-आनंद सारडा, वितरक, प्रदीप गॅस एजन्सी, बीड*