रेशन दुकानदाराने केली लाभार्थ्याला दांड्याने मारहाण
तलवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद
गेवराई - गेवराई तालुक्यात मुख्यमंत्री व पंतप्रधान आपत्कालीन धान्य वितरण अध्यादेश प्रति माणूस पाच किलो प्रतिव्यक्ती सर्वांसाठी देण्याचे आदेश शासनाने दिले असताना गेवराई तालुक्यातील पुरवठा अधिकारी दुकानदार यांच्या वितरण व्यवस्थेचे बारा वाजले असल्याचे लक्षात येत आहे. पुरवठा अधिकारी ,गोडाऊन किपर,रेशन दुकानदार या त्रिमूर्तीने खर्या लाभार्थींना ऑनलाईन नावाच्या राक्षसामुळे गेवराई तालुक्यात 75 टक्के लोक वंचित असल्याची माहिती समोर येत आहे. ऑनलाईन न झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना धान्य मिळत नाही. गेवराई तालुक्यात असणाऱ्या 254 दुकानदार व गेवराई शहरात 1 ते 19 दुकान त्यात ग्राहक भंडारा चा समावेश आहे. गेवराई तालुक्यात 80% दुकानदाराच्या तक्रारी लाभार्थ्यांनी दिले असतानाही कुठलेही पाहून शासनाने उचलले नाही. आपत्कालीन व्यवस्था ही कोलमडली आहे. लाँकडाऊनच्या काऴात लोकांना धान्याची अत्यंत गरज भासत आहे. त्यामुळे गेवराई तालुक्यातील रेशन दुकानदारांची अरे रावी हि आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलीच आहे. राजकीय वरदहस्ताचा गैरवापर करून पुरवठा विभाग,रेशन दुकानदार मजबूर लाभार्थ्यांवर आपला चाबूक चालवताना दिसत आहेत. पुरवठा अधिकारी गेवराई, पुरवठा अधिकारी बीड माञ दुकानदारांना पाठीशी घालत असल्याचे लोकांमध्ये चर्चा आहे. मोफत तांदूळ प्रतिव्यक्ती पाच किलो न देता कमी देऊन दुसऱ्याला चढ्या भावाने विकून स्वतःचे उखळ पांढरे केल्याचे दिसून येत आहे. अनेक गावातील दुकानदारांचे निलंबनाचे प्रस्ताव पुरवठा अधिकारी बीड यांच्याकडे टेबलावर धूळखात पडलेले आहेत. लाखो रुपयांचा तांदूळ खाल्ला कोणी याची उच्चस्तरीय चौकशी केल्यास पुरवठा अधिकारी व दुकानदार निलंबीत होतील त्यामुळे त्यांची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.