लाईनमनने विजेचा आकडा काढला म्हणून मारहान चोरून वीज वापरत असतानाही दादागिरी

लाईनमनने विजेचा आकडा काढला म्हणून मारहान 


चोरून वीज वापरत  असतानाही दादागिरी


केज - बीड जिल्ह्य केज तालुक्यातील विडा गावात लाईनमनने विजेचा आकडा काढला म्हणून आकडा टाकणाऱ्या व्यक्तीने लाईनमनला जबर मारहाण केली आहे. चोरून वीज वापरत असताना दादागिरी करत मारहाण केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून या वीज चोराविरुद्ध  कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 
महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी सर्रासपणे विजेच्या तारेवर आकडे टाकून वीज वापरली जात आहे. या विजचोरीमुळे शासनाने करोडो रुपये नुकसान होत आहे. शासनाकडून अशा विजचोराविरुद्ध कारवाई करते परंतु ही कारवाई नियमितपणे होत नसल्यामुळे विजचोरीचा प्रकार वाढत आहे. अशीच एक घटना केज तालुक्यातील विडा येथे घडली आहे. शरद घुटे हे लाईनमन म्हणून काम करतात. त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावत गावातील आकडे काढण्यास सांगितले होते. अनेकांनी आकडे काढले लाईनमनने गावातील तारेवर टाकलेला विजेचा आकडा काढला म्हणून दोघा बापलेकाने माझ्या घराचा आकडा का काढायला लावला असे म्हणत ,दगडाने मारहान करत शिवीगाळी केली व सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे दत्तात्रय संपतराव पटाईत व त्याचा मुलगा शुभम पटाईत या दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पटाईत यांचे विजेचे बिल हे थकलेले आहे त्यामुळे त्यामुळे त्याचे वीज मीटर कापलेले आहे म्हणून ते ते विजेचा ते विजेचा आकडा टाकून चोरून वीज वापरत आहेत अशी माहिती मिळाली आहे.
शरद घुटे हे वीज वितरण कंपनीच्या मस्साजोग येथे वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत आहेत.१०एप्रिल रोजी घुटे यांना देवगाव येथे दुरुस्ती कामासाठी जायचे होते म्हणून त्यांचे सहकारी सय्यद वहिदोद्दीन हे विडा बसस्टँड वर उभे होते. तेव्हा घुटे हे पोहोचले त्याचवेळेस दत्तात्रय पटाईत हे तेथे आले व घुटे यांना माझा आकडा का काढायला लावला असे म्हणून त्याच्या मुलाने व त्याने घुटे यांना दगडाने बेदम मारहाण केली. त्यानंतर सय्यद यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे भांडण सोडवले . त्यानंतर लाईनमन यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात १४७/ २०२० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. भा. द. वी.३५३,  ३३२, २२३, ५०४,५०६, ३४ त्या दोघा बापलेकाविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे तपास करत आहेत. या सदर तक्रारीचा योग्य तपास करून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल असे काळे यांनी सांगितले.