मी.C.O  सदा गैरहजर ' पाटोदा नगरपंचायत मध्ये खुर्चीला हार घालुन मुख्याधिका-याच्या गैरहजरीचा केला पंचनामा 

'मी.C.O  सदा गैरहजर ' पाटोदा नगरपंचायत मध्ये खुर्चीला हार घालुन मुख्याधिका-याच्या गैरहजरीचा केला पंचनामा 



पाटोदा - संपुर्ण देशात कोरोना व्हायरसच्या उच्चाटना साठी सरकारने लॉकडाऊन करुन युध्द पातळीवर उपाययोजना चालु आहे .मात्र पाटोदा नगरपंचायतचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले हे सतत गैरहजर असल्याने स्वतः नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आरोग्य,सभापती राजु  जाधव व अन्य नगरसेवकांनी पंचनामा करुन खुर्चीला हार घातला व  मी सी ई ओ सदा गैरहजर ' असे त्या खुर्चीवर लिहले आहे.
  कोरोना च्या पार्श्वभुमीवर देशात लॉकडाऊन आहे .प्रत्येक विभाग प्रमुखांनी मुख्यालयी हजर रहावे असे सक्त आदेश असतानाही पाटोदा नगरपंचायतचे मुख्य अधिकारी शशिकांत भोसले हे सतत गैरहजर राहात असल्याने पाटोदा नगरपंचायत क्षेत्रात कोणतीही उपाययोजना करता येत नाही .कोविड १९ च्या बाबतीत आतापर्यंत जे कामे झाली ती लोकनेते सुरेश (अण्णा) धस यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षा सौ अनिता नारायणकर उपाध्यक्ष  आरोग्य सभापती  राजु जाधव ,व नगरसेवकांनी स्वनिधीतुन केली आहेत . मात्र मुख्य अधिकारी शशिकांत भोसले हे पाटोदा शहरास वा-यावर सोडुन बेपत्ता आहेत .लॉकडाऊन च्या सुरुवातीला उपविभागिय अधिकारी नम्रता चाटे ,तहसिलदार रमेश मुंडलोड यांनी बोलाविलेल्या महत्वाच्या बैठकीसही भोसले हे गैर हजर होते .त्याही वेळी मु. अ. यांच्या गैरहजेरीचा निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते .पाटोदा नगरपंचायतने आतापर्यंत कोणतीही उपाययोजना केलेली नाही.नगरपंचायतचे कर्मचारीही असुरक्षित आहेत .बीड जिल्ह्यातील इतर नगरपंचायतने कोविड-१९ रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न चालु आहेत मात्र पाटोदा शहरात मु. अ. सतत गैरहजर राहात असल्याने कोणतीही उपाययोजना करता येत नाही .शशिकांत भोसले हे मुद्दामहुन गैरहजर राहात असल्याने आरोग्य सभापती राजु जाधव यांनी निवेदन देऊनही काही सुधार नसल्याने नगराध्यक्ष गणेश नारायणकर उपनगराध्यक्ष  आरोग्य सभापती राजु जाधव , नगरसेवक यांनी त्यांच्या खुर्चीस हार घालुन लिहले मी सीई ओ सदा गैरहजर व कक्ष अधिका-यांकडुन पंचनामा लिहीला .पचंनाम्यावर नगरपंचायतच्या सर्व कर्मचा-यांच्या सह्या आहेत .