जनता उपाशी नेते कोरोंटाईन*   ,     *कार्यसम्राट म्हणुन घेणारे नेते कुठे आहेत*

*जनता उपाशी नेते कोरोंटाईन*   
             
*कार्यसम्राट म्हणुन घेणारे नेते कुठे आहेत*


*काका,आबा,दादा,आण्णा, भाऊ,साहेब,भैय्यासाहेब,ऱ्हदयस्थान,राजे,अामचे प्रेरणा स्थान कुठे आहात जनता आपली वाट पाहत आहे*


मुंबई- भारतात कोरोना नावाची आजाराने थैमान घातले आहे .पाहता पाहता हा रोग शहरा पासुन ग्रामीण भागात हि डोक वर काढु लागला आहे याला रोखण्यासाठी आपले सरकार आणी सामाजिक संस्था हि कामाला लागल्या आहेत महत्वाचे म्हणजे लाँकडाऊन हे ब्रम्हास्त्र जबरदस्त वापरल्याने कोरोना चा फैलाव बराच आटोक्यात आला आहे.                      
     एक बाब मात्र कोणाला समजेना निवडणूक काळात मतदार राजाला वेगवेगळे  आश्वासने देणारे मतासाठी विकास कामाबाबत निरनिराळे आश्वासन देणारे आणी शेवटी निवडून येतच नाही हे लक्षात आल्यावर मतदारसंघात मतदाराना दारु , मटन खाऊ घालणारी पांढरी पिलावळ आता गेली तरी कुठे आज सरकार मदतीला धावतय सामाजिक संस्था धरपड करतायत कि आज काही जरी झाले तरी महाराष्ट्रात उदभवलेल्या महामारीतुन जनता वाचली पाहिजे म्हणून सर्व स्थरातुन सहकार्य होताना दिसत आहे.  परंतु आमचे नेते, दादा, नाना, काका, राजे, साहेब , आबा , बाबा,  आन्ना , भैय्या , हृदयस्थान हे आता अशा वेळेस आपल्या बाले किल्यातल्या मावळ्यांना मदतीला का येईनात नेमक काय झालय या लोकांना आज पंधरा दिवस झालेय लाँकडाऊन सुरु झालय.आहो ज्या मतदारसंघात  आपण लाखाेंच्या सभा लावल्या लोक बिचारे पडत्या पावसात आपले भंपक भाषणे ऐकुन तुमच्या सभेला हजर राहिले आज हिच भोळी भाबडी जनता व तुमचा कार्यकर्ता तुमच्या  एका फोनची आणी मदतीची वाट पाहातोय पण अद्याप एका हि पाढंरपेशा वर्गानी जनतेला मदत ,धिर किंवा घाबरू नका आम्ही आपल्या बरोबर आहोत आसा धिर दिला नाही. मान्य आहे. संचार बंदी आहे. लाँकडाऊन आहे. म्हणून भेटता येत नाही आस मनायचे का आपल्याला. मग आम्ही म्हणतो की जसे आपण निवड नुकीत मतासाठी पैसा वाटण्यासाठी किंवा दारू ,मटन कसे पोचवता तशी आत्ता हि जनता वाचवण्यासाठी डोक लावा आणी आपल्या बालेकिल्ला वर त्या ठिकाणी आसणाऱ्या लोकाचा विचार करा नुसत्या निवडणूकी पुर्ता विचार करणे सोडा आज जनता संकटात आहे. पुढाऱ्यांनो जरा मैदानात या आज खरच लोकांना हाताला काम नाही. खिशात दाम नाही. किराणा दुकानात आव्वाच्या सव्वा किमतीत माल दिला जातोय.
   सर्वसामान्याना पंपावर पेट्रोल, डिझेल मिळेना .दवाखान्यात जातानाही पोलीस दांडे घालत आहे. एक लक्षात घ्या ज्या जनतेच्या मतावर सरकार स्थापन झाले. त्याच सरकार चे पोलीस आम्हाला नाहक बडवत आहेत. परंतु पुढाऱ्यांनो. पोलिसांनो लाँकडाऊन थोडे दिवस चालेल नंतर आम्ही नागरिकच आपल्याला कामी येणारे आहोत. आणी आज आम्ही संकटात आहोत आपली जबाबदारी समजून आम्हाला सहकार्य करा असा सुर सध्यातरी आम जनतेतुन निघत आहे.