पिठ्ठी गावात रक्तदान शिबीर संपन्न
सरकारच्या आवाहनाला पिठ्ठीतील युवकांचा प्रतिसाद
ईट - कॉरोनाच्या(कोविड19) वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने केलेल्या आवाहनाला पिठ्ठी गावातील युवकांचा प्रतिसाद लाभला. जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँकच्या माध्यमातून व विनोद खोमणे, सतिश कवठेकर, श्रीराम तुपे, गोकुळ इंगोले,यांच्या सहकार्याने जवळपास गावातील तीस युवकानी रक्तदान केले, नानासाहेब कवठेकर, विजय कुडके (ग्रा.स.), किरण भोंडवे,अजिनाथ कवठेकर, दीपक खोमणे, गणेश जागडे, सतिश कवठेकर, प्रशांत गाडे,किशोर भोंडवे, सुनील भंडारे,मुकेश भंडारे, सागर कुडके बाळू गाडे, भारत कवठेकर, ओंकार काळे,नंदू तावरे,गणेश दोडके आणि इतर तरुणांनी रक्तदान करून त्यांनी आपलं कर्तव्य बजावले. त्यावेळी सामाजिक अंतर पाळण्यात आले असून गावचे सरपंच राधाकिसन तुपे, उपसरपंच सुनिल इगोले उपस्थित होते.