शासनाच्यावतीने अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करणार - जिल्हाधिकारी राहुल रेखावार
बीड - शासनाच्या वतीने शेतकरी नागरिकांच्या खात्यांमध्ये विविध अनुदान जमा करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.
शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये विविध अनुदान जमा करण्यात येणार असून एस एम एस संदेशाद्वारे खातेदारास याची माहिती कळविली जाईल. स्टेट बँकेच्या वतीने ही रक्कम काढण्यासाठी प्रत्येक खातेदारास साधारण वेगवेगळी तारीख निश्चित करण्यात आली आहे असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक नंदकिशोर भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे .२ एप्रिल पासून १० एप्रिल २०२० पर्यंत हे अनुदान नागरिकांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार असून शेतकरी नागरिकांनी ही अनुदान रक्कम त्यांना त्यांच्या मोबाईल फोन वर रक्कम जमा झाल्याचा एस एम एस संदेश प्राप्त झाल्यानंतर निश्चित केलेल्या दिनांकास ३ एप्रिल पासून ११ एप्रिल २०२० पर्यंत पुढील प्रकारे काढता येईल. बँक खातेदाराचा खाते क्रमांकाचा शेवटचा नंबर ० व १ असल्यास बँकेत अनुदान २ एप्रिल रोजी जमा होईल व खात्यातून पैसे काढण्याची तारीख ३ व ४ एप्रिल २०२० राहील. तसेच खाते क्रमांकाचा शेवटचा नंबर २ व ३ असल्यास अनुदान ४ एप्रिल रोजी जमा होईल व पैसे ५ व ६ एप्रिल रोजी काढता येतील. खाते क्रमांकाचा शेवटचा नंबर ४ व ५ असल्यास अनुदान ६ एप्रिल रोजी जमा होईल व पैसे ७ व ८ एप्रिल रोजी काढता येतील. तसेच खाते क्रमांकाचा शेवटचा नंबर ६ व ७ असल्यास अनुदान ८ एप्रिल रोजी जमा होईल व पैसे ९ व १० एप्रिल रोजी काढता येतील. खाते क्रमांकाचा शेवटचा नंबर ८ व ९ असल्यास अनुदान १० एप्रिल रोजी जमा होईल व पैसे ११ एप्रिल व पुढे काढता येतील. जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेशांच्या पार्श्वभूमीवर रक्कम काढण्यासाठी बँकेत गर्दी होऊ नये यासाठी ही उपाययोजना अमलात आणली आहे.