कोरोनाचा सामना करण्यासाठी खाजगी रुग्णालयाची मदत घेणार - आ.गीता जैन
भाईंदर- भाईदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय कोरोनासाठी आरक्षित करण्यात आले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी गरज पडल्यास मिरा भाईंदर शहरातील खाजगी रुग्णालयाची मदत घेतली जाईल असे स्थानिक आमदार गीता जैन यांनी रुग्णालयाला भेट दिली असता माहिती दिली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पूर्ण सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
या रुग्णालयात सध्या पन्नास बेड तयार असून त्यात दहा आयसीयु बेड असून त्यात लवकरच वाढ करुन आवश्यक त्या सुविधा पुरविण्याबाबत आ.गीता जैन यांनी प्राशसनाला निर्देश दिले. रुग्णालयातील रुग्णाच्या जेवणाची सोय आ. गीता जैन यांच्या कडून करण्यात येणार आहे तसेच शहरातील खाजगी रुग्णालयातील काही व्हेंटिलेटर मशीन पंडित भीमसेन जोशी रुग्णालयाला देणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी आमदार गीता जैन यांच्या सोबत मिरा भाईदर महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.