भारतीय जनता पार्टी बीड च्या वतीने पत्रकार व प्रसारमाध्यमातील श्रमिक कामगारांची वैद्यकीय तपासणी करून 100  कामगारांना किराणा किटचे वाटप 

भारतीय जनता पार्टी बीड च्या वतीने पत्रकार व प्रसारमाध्यमातील श्रमिक कामगारांची वैद्यकीय तपासणी करून 100  कामगारांना किराणा किटचे वाटप 


बीड - भारतीय जनता पार्टी बीड च्या वतीने पत्रकार व प्रसारमाध्यमातील श्रमिक कामगारांची वैद्यकीय तपासणी करून 100  कामगारांना किराणा किटचे वाटप भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. पञकारभवन येथे आयोजित कार्यक्रमात  दैनिक पार्श्वभूमी चे संपादक गम्मत भाऊ भंडारी पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष वैभव स्वामी श्रीपती माने ज्येष्ठ पत्रकार सर्वश्री उत्तम हजारे, संदीप बेद्रे ,दीपक जाधव ,शेखर कुमार, टीव्ही नाईन चे वार्ताहर मुधोळकर यांच्यासह प्रसारमाध्यमातील पत्रकार बांधव व कामगार उपस्थित होते. डॉक्टर लक्ष्मण जाधव डॉक्टर विक्रांत हजारी भगीरथ बियाणी से फारूक सरकार राजेश यांनी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे शुगर , बीपी टेंपरेचर आदि वैद्यकीय तपासणी करण्यात आली.  यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यासह शांतिनाथ डोरले, प्रल्हाद धनकुडे, कल्याण पवार ,राकेश बिराजदार, महेश सावंत, बद्रीनाथ जटाळ, विकास गव्हाणे ,अजय ढाकणे , अविनाश नवले,सचिन पर्जने ,निखिल तिपाले, दत्ता परळकर ,यांनी सहकार्य केले आहे.