मुंबईच्या डाॅक्टरला गेवराईत केले होम क्वारांटाईन

मुंबईच्या डाॅक्टरला गेवराईत केले होम क्वारांटाईन


बीड- गेवराई येथील रहिवासी व मुंबई येथे नामाकिंत दवाखान्यात आरोग्य सेवा  करणाऱ्या डाॅक्टरला मंगळवारी राञी  प्रशासनाने गेवराई येथील पोलिस स्टेशन जवळील निवासस्थानी होम क्वारांटाईन केले आहे.सदरील डाॅक्टर हा सोमवारी राञी दहाच्या सुमारास मुंबई येथून आपल्या वाहनातून गेवराई येथे आला होता.हा डाॅक्टर मुंबई येथून गेवराई कडे ठिकठिकाणी चेक पोस्ट आसताना गेवराईत आला कसा ? त्याला विचारणा का केली नाही असे एक ना अनेक प्रश्न गेवराई शहरातील नागरिक उपस्थित करत आहे.
     गेवराई शहरातील पोलिस स्टेशन जवळील रहिवासी असलेले एक डाॅक्टर हे दहा ते पंधरा वर्षापासून मुंबई येथील एका नामाकिंत दवाखान्यात आरोग्य सेवा म्हणून काम करत आहे.आजवर त्यांची ही सेवा कायम आहे.सध्या जगात कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे नागरिक हैराण झाले आहेत.भारत देशात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई येथे आढळून येत आहे.अशातच मुंबई येथील व सध्या गेवराई येथे निवासस्थान असलेले हे डाॅक्टर सोमवारी राञी आपल्या वाहनातून गेवराईत आले आहे.त्यामुळे व मुंबई येथील हे डाॅक्टर असल्यामुळे परिसरातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन हि माहिती या भागातील नागरिकांनी गेवराई प्रशासनाला दिली.
     त्यानुसार मंगळवारी राञी आठच्या सुमारास आरोग्य विभागातील डाॅ.शेख, आंधळे व अन्य डाॅक्टरसह तलाठी राजेश राठोड,पोलीस आईटवार आदिनी पोलिस स्टेशन जवळ आसलेल्या यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना होम क्वारांटाईन केले आहे.यामुळे गेवराई शहरात चर्चेचा विषय झाला आहे.दरम्यान हा डाॅक्टर मुंबई येथून अनेक जिल्ह्याच्या सिमा पार करत गेवराई शहरात आला कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.