काशीमीरा येथील मनाली व्हिलेज  असोसिएशनची कोरोनासाठी परिसराची काळजी

काशीमीरा येथील मनाली व्हिलेज  असोसिएशनची कोरोनासाठी परिसराची काळजी


मिरारोड- काशीमीरा परिसरातील मनाली गृहसंकुलातील सर्व सभासद ,अध्यक्ष, पदाधिकारी यांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आणि संक्रमण परिसरात पसरू न देण्यासाठी मनाली व्हिलेज असोसिएशन तर्फे काही महत्वपूर्ण  निर्णय घेऊन परिसराची व रहिवाशांची काळजी घेतली जात आहे.
 मनाली व्हिलेज या गृहासंकुलात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी गेटमध्येच सॅनिटायझर ठेवले आहे तसेच काही सूचना फलक लावले आहेत.
१. बाहेरून मनालीत प्रवेश करताना सेनीटाइजरचा हात स्वच्छ करण्यासाठी उपयोग करावा. २. कामाकरिता बाहेर निघताना तोंडावर  मास्क/ रुमाल बांधल्या शिवाय निघू नये . ३. अति आवश्यक कामा शिवाय बाहेर निघू नये. ४. मेन गेट कुलूपबंद करण्यात आले आहे. ५. दोन चाकी, चार चाकी गाड्या बाहेर घेऊन जाऊ नये. ६. दूध /बिस्किट/पाव इतर वस्तूंची सोय मनाली संकुलातील मैदानात केली आहे. त्यामुळे दुध घेण्यासाठी बाहेर जाऊ नये. 
७. भाजीपाला गाडी एक दिवस आड किंवा रोज सकाळी मैदानात ९.०० ते ११.०० पर्यंत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाजी घेण्यासाठी सोसायटीतून बाहेर जाऊ नये. 
८. किराणा माल घरपोच करण्यासाठी प्रत्येक सोसायटीमधून दोन स्वयंसेवक सेवक घेतले आहे. ते किराणा माल घरपोच करतील. त्यामुळे बाहेर कोणीही किराणामाल घेण्यासाठी जाऊ नये. ९. बोरिवली, दहिसर, मिरा रोड स्टेशन येथे करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून व इतर ठिकाणाहून कोणी मनाली रहिवासीयांच्या घरात ५ दिवसांपुर्वी रहाण्यास आले असल्यास कृपया त्यांनी असोसिएशनला कळवावे.
१०. बाहेरील नातलगास व मित्र मैत्रिणीस घरी बोलवू नये. व आपणही त्यांच्याकडे जाऊ नये (काही काळाकरिता) 
११. लहान मुले, बालके व ६० वर्षावरील वयस्क यांनी घराबाहेर पडू नये. १२. प्रत्येकानी आपापल्या घरामध्येच थांबायचे आहे. १३. मैदानात कोणीही कामाशिवाय बसू नये. १४. सकाळी /संध्याकाळी फिरण्यासाठी घराबाहेर निघू नये. १५. प्रत्येकजण घरामध्ये राहणार तो सुरक्षित असणार. 
१६. आपल्या संकुलात कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही याची प्रत्येकानी खबरदारी घ्यावी. उपरोक्त निर्णयाचे पालन करावे. १७. प्रत्येक सोसायटीने जे लिफ्टचा वापर करतात त्यांनी लिफ्टजवळ सॅनीटाइजर ठेवण्याची व्यवस्था करावी.
१८. आज मनाली संकुलात पोलिसांच्या धाडीत असे आढळून आले कि अजुनही लोक मैदानात मोठ्या संख्येने टाईम पास करण्यासाठी बसलेले असतात.१९. प्रत्येक सोसायटीने त्यांचे ग्रील गेट कुलुप लावून बंद करावे. कामाकरिता सकाळी ९ ते ११ व संध्याकाळी ६ ते आठ वाजता खुले ठेवावे.२०. अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर, पोलीस, मनपा कर्मचारी, बॅंक कर्मचारी ईत्यादी यांना कामावर रुजू होण्यासाठी सोडावे. असे सुचनाफलक लावले असून सर्व रहिवाशांची काळजी घेतली आहे. तसेच सर्व सभासदांनी मनाली असोसिएशनला सहकार्य करावे असे म्हटले आहे.