शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्या, मजुरांच्या हाताला काम देऊन रेशनकार्ड नसणाऱ्यांना धान्य देण्यात यावे

शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्या, मजुरांच्या हाताला काम देऊन रेशनकार्ड नसणाऱ्यांना धान्य देण्यात यावे


पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकित आ. संदीप क्षीरसागर यांची मागणी


बीड - खरीप हंगामात बियाणे, खतांचा तुटवडा दाखवून काळा बाजारं होऊ नये,शेतकऱ्यांना त्यांच्या मागणी प्रमाणे बियाणे खते कीटकनाशके उपलब्ध झाली पाहीजेत. सद्या शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे त्यांना तातडीने पीक कर्ज द्या,जिल्हा बँक व इतर बँकांकडे थकीत दुष्काळी अनुदान,पीक विमा याचे वाटप करण्यात यावे.मजुरांच्या हाताला काम देऊन ज्यांच्या कडे कोणतेच रेशन कार्ड नाही आशा लोकांनाही धान्य मिळाले पाहिजे,कापूस,तूर हरभरा खरेदी केंद्र नव्याने वाढवण्यात यावेत. कापूस खरेदी २० शेतकरी मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी केली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले  बैठकीत त्यांनी विविध विषय मांडले.
       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात आज खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीचे आयोजन केले होते,यावेळी  पालकमंत्री धनंजय मुंडे  आमदार सुरेश धस , आ. संदीप क्षीरसागर,आ. विनायक मेटे तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या शिरसाट, आमदार प्रकाश सोळुंके ,बाळासाहेब आजबे ,लक्ष्मण पवार , संजय दौंड आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते . याच बरोबर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते. 
    यावेळी खरीप हंगामाच्या नियोजना बरोबरच कोरोनाच्या संकटात शासनाच्या विविध विभागांच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत ही चर्चा झाली तसेच मागील हंगामातील पिक विमा व कृषी वीजपुरवठा योजनेतील अडचणी देखील चर्चा करण्यात आले. यावेळी पुढे बोलताना आ. संदीप क्षीरसागर म्हणाले की, बीड विधानसभा क्षेत्रात खरीप हंगाम लागवड क्षेत्र १ लाख १० हेक्टर जवळपास आहे. यात सर्वाधिक कापसाची लागवड असते त्यानंतर स्वायाबीन,  तून आदी पिके घेतली जातात या पिकांच्या अभियानांमध्ये आणि खतांमध्ये तसे प्रकारचा तुटवडा भासू नये शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. सध्या शेतकऱ्यांच्या घरातील,शेतातील माल बाजारपेठेपर्यंत जात नाही, कापूस असेल इतर धान्य असेल ते बाजार पेठेत नेऊन विक्री झाली नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. अशावेळी जिल्ह्यातील बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पिक कर्ज द्यावे, शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या रकमा बँक खात्यात जमा आहेत त्या तातडीने देण्यात याव्यात. ज्याच्याकडे कुठलेच  रेशन कार्ड नाही अशांनाही धान्य देण्यात यावे, बीड मतदारसंघातील शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या वीज जोडणी साठी पैसे भरले परंतु पैसे भरूनही वीज जोडण्या दिल्या जात नसल्याने यावर थेट कारवाई करण्यात यावी, कापूस खरेदी केंद्रावर फक्त २० लोकांचा कापूस घेतल्या जातो त्याची मर्यादा वाढवण्यात यावी शेतकऱ्यांना या संकटकाळात शासनाने धीर द्यावा अशी मागणीही यावेळी आमदार क्षीरसागर यांनी केली आहे
 कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील सोबत गावांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे .ऊस तोड कामगार आणि पुणे , मुंबई येथील मजूर देखील जिल्ह्यात परत आला असल्याने मनरेगा मधून कामे सुरुवात केली जातील असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.