लायन्स क्लब ऑफ रायझिंग स्टार यांच्याकडून मास्क, सॅनिटाइजर व गरीब कुटुंबांना अन्न धान्य वाटप

लायन्स क्लब ऑफ रायझिंग स्टार यांच्याकडून मास्क, सॅनिटाइजर व गरीब कुटुंबांना अन्न धान्य वाटप


मिरारोड- कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सुरु असलेल्या २१ दिवसाच्या लॉकडाउन मध्ये अनेक नागरिकांना जेवणाची समस्या निर्माण झाली आहे.  काम बंद असल्यामुळे पैसे नाहीत व बाहेर जाऊ शकत नसल्यामुळे अनेक नागरिकावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या गरीब व गरजू नागरिकांना लायन्स क्लब ऑफ रायझिंग स्टार यांच्याकडून मास्क, सॅनिटाइजर व अन्न धान्य वाटप करण्यात आले आहे.
 काजु पाडा,घोडबंदर रोड  येथील आदिवासी पाड्यावर महापौर ज्योत्सनाताई हसनाळे यांच्या हस्ते लायन्स क्लब ऑफ रायझिंग स्टार यांच्याकडून मास्क आणि सॅनिटाइजर व राजस्थानी सेवा संस्था,भाईंदर यांच्या वतीने सुमारे १०० गरीब आदिवासी बांधवांना १५ दिवस पुरेल एवढे राशन (किराणा सामान) याचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी महापौरांसोबत राजस्थानी सेवा संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र गुप्ता ,महासचिव विकास केडिया ,सुभाष सिंघानिया ,नरेश केडिया , लायन्स क्लबचे बबिता केडिया ,नितीश वर्मा, मनोज खेमका शिवमावळा प्रतिष्ठाण चे सुभाष काशिद,संतोष काशिद उपस्थित होते .या समाजकार्याबद्दल महापौरांनी सदर संस्थेचे कौतुक केले व आभार मानले. तसेच इतर ही स्वयंसेवी संस्थांनी लायन्स क्लब व राजस्थानी सेवा संस्था सारखे समाज कार्य करण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.