पाटोदा येथील आठवडी बाजार आज बंद

पाटोदा येथील आठवडी बाजार आज बंद
पाटोदा -: (हमीद पठाण) पाटोदा येथील आठवडी बाजार गुरुवारी आसतो परंतु कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशामुळे पाटोदा येथील आठवडी बाजार बंद करुन लोकांना कोरोना व्हायरसच्या बद्दल खबरदारी बाळगण्यास सांगण्यात आले. जास्त लोकांनी एकत्र जमवू नये असे आदेश असल्यामुळे ता.पाटोदा येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय पाटोदा नगरपंचायतने व शासनाने घेत कोरोनाबद्दल जनजागृती केली.पाटोदा बाजार बंद केल्यामुळे पाटोदा येथे बाजारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांचे व शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु प्रत्येक व्यापाऱ्यांनी ह्या निर्णयाचे स्वागतच केले आहे. आमदार सुरेश (आण्णा ) धस यांच्या मार्गदर्शानाखाली  पाटोदा  येथील आरोग्यविभाग व नगरपंचायत आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या रोगाची लागन होऊनही म्हणुन जनजागृती करत आहे. तर बाजार बंद केल्यामुळे आमचे थोडे - फार नुकसान झाले आहे. मात्र हा निर्णय योग्य असुन कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वानी काळजी घेतली पाहिजे असे मत व्यापारी व शेतकऱ्यांनी  केली आहे.