मुख्यमंत्री साहेब, तेवढं आमच्या ऊसतोड कामगारांना गावाकडे पाठवा : संजय सानप
▪ नातेवाईक, वृद्ध माता- पिता,व चिमुकल्यांसह गावकऱ्यांची आर्त हाक ▪
बीड - (हरिदास शेलार )
'पोटाची खळगी भरण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्र व इतर जिल्ह्याच्या ठिकाणी बीड जिल्ह्यातील ऊस तोड कामगार गेलेले आहेत. दरम्यान गेल्या आठवड्यापासून कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातल्यामुळे इकडे भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्या ऊसतोड कामगारांच्या नातेवाईक, शाळकरी मुले, वृद्ध व ग्रामस्थांना चिंता वाढली असून त्यांना एकदा गावाकडे पाठवा, अशी आर्त हाक मागणी सौताडा येथील पत्रकार संजय सानप यांनी व सर्व ऊसतोड कामगार यांच्या कुटूंबीय यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील हजारो ऊसतोड कामगार जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्र व काहीजण परराज्यात ही ऊसतोडीसाठी गेलेले आहेत. दरम्यान, राज्य व देशभर कोरोना विषाणूचा प्रसार गेल्या काही दिवसापासून होत असल्याने शासनाने मोठ्या उपाययोजना केलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री व माननीय आरोग्यमंत्र्यांनी सतर्कता दाखवत देश, राज्यासाठी व समाजासाठी मोठे नियोजन केलेले आहे ,त्याबद्दल तमाम जनतेतून त्यांचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील विशेषतः पाटोदा, शिरूर कासार, धारूर ,केज सह जिल्ह्यातील ईतर तालुक्यातील हजारो ऊसतोड कामगारांच्या मुलांना वृद्ध माता-पित्यांचा आणि नातेवाईक ग्रामस्थांच्या या ऊसतोड कामगारांची त्यांना काळजी लागली आहे. तरी मुख्यमंत्री साहेब यांनी लक्ष घालून या ऊसतोड कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठवून त्यांच्या चिमुकल्या मुलांचा व नातेवाईकांचा आणि गावकर्यांचा आशीर्वाद घ्यावा अशी भावनिक साद तथा विनंती त्यांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांमधून केली जात आहे.