मिरा भाईंदर पालिका प्रशासनाकडून शहरात ठिकठिकाणी भाजी मार्केटची व्यवस्था

मिरा भाईंदर पालिका प्रशासनाकडून शहरात ठिकठिकाणी भाजी मार्केटची व्यवस्था



 भाईंदर- केंद्र शासनाने कोरोना (COVID-19) चा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 21 दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. उपाययोजनेचा भाग म्हणुन सर्व सामान्य जनतेने घरी राहण्याचे आवाहन केले आहे. सदर 21 दिवसाच्या कालावधीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडू नये व नागरिकांच्या सोईकरिता मिरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे भाजी मार्केटची व्यवस्था करण्यात आली आहे असे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले. 
शहरात खालील ठिकाणी भाजी मार्केटची व्यवस्था आहे .
1) रामदेव पार्क – मिरारोड (पूर्व)
2) लतीफ पार्क – एस.के.स्टोन समोर, मिरारोड (पूर्व)
3) मंगल नगर – हटकेश, मिरारोड (पूर्व)
4) आशा नगर – आर.एम.पी. पार्क, भाईंदर (पूर्व)
5) एल.बी.टी. कार्यालय – मॅक्सेस मॉलच्या मागे, भाईंदर (पश्चिम)
6) सुभाषचंद्र बोस मैदान – उत्तन रोड, भाईंदर (पश्चिम)
 तसेच  खालील ठिकाणी मार्केटची सुविधा करण्याची तयारी सुध्दा करण्यात येत आहे.
1) मिनाताई ठाकरे मंडी – भाईंदर (पूर्व)
2) सिल्व्हर सरिता बिल्डींग – काशीगाव जवळ
3) अल हजरत मैदान – कानुगो इस्टेट जवळ, पयाडे हॉटेलच्या मागे, मिरारोड (पूर्व)
4) बालाजी हॉटेलच्या मागे – शांती पार्क, मिरारोड (पूर्व)
 सदरच्या भाजी मंडी या नागरिकांसाठी सकाळी 7 वा. ते सायंकाळी 6 वा. पर्यंत खुले राहतील. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मोठया प्रमाणात गर्दी करु नये व तोंडावर मास्क अथवा रुमालाचा वापर करावा. तसेच भाजी व आवश्यक सामान खरेदी करताना 2 व्यक्तींमधील अंतर कमीत कमी 1 मीटर ठेवावे. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये थेट भाजीपाला पुरविण्याबाबत प्रयत्न करण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, शिस्तिने आवश्यक वस्तूंची खरेदी करावी अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे विनाकारण बाहेर पडू नये. 
 26 मार्च पासून नगरभवन, भाईंदर (प.) येथे भाजी विक्रेते, घाऊक व्यापारी, मटन विक्रेते व इतर व्यापारी यांच्या संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक मा. आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी बोलावली होती त्यावेळी या बैठकीमध्ये प्रत्येकामध्ये 1 मीटर अंतर ठेवण्यात आले. आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी व्यापाऱ्यांना सूचना देताना व्यापाऱ्यांच्या वस्तूंचा पुरवठा करताना येणाऱ्या अडचणी व तक्रारींची माहिती घेऊन आवश्यक वस्तूंचा पुरवठा करताना नागरिकांची गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे असे सांगितले व ट्रान्सपोर्ट वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या समस्यांचे निरसन केले. तसेच Social Distancing चा वापर करावा व नागरिकांनाही तसेच सांगावे. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी रांगेचा वापर करावा व कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी शासनाने व महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे जाहिर आवाहन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले आहे.