नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लॉकडाउन व संचारबंदीला हरताळ
संचार बंदीचे उल्लंघन करत भाईंदर मध्ये पूजा व होम हवन सुरू असल्याचा प्रकार उघडकीस
भाईंदर- देशात लॉकडाऊन व संचारबंदी सुरू असतानाही मिरा भाईंदर मध्ये त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. रामदेव पार्क येथे काही जण हे धार्मिक विधी करण्यासाठी लोकांना एकत्र जमा करत असून गेल्या काही दिवसापासून नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका लग्नाच्या मंगल कार्यालयात होम हवनच्या नावाखाली दररोज काही लोक एकत्र येऊन रात्री कार्यक्रम करत आहेत. त्यामुळे परिसरात सगळीकडे धुरच-धुर दिसत आहे.
देशात सध्या लॉकडाऊन असताना व संचारबंदी असतानाही दररोज १५ ते २० जण मिळून कार्यक्रम करत असतात. याची स्थानिक पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांना माहीती असल्याचे सांगितले जाते. कोरोनाच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव सरकारने रोखण्यासाठी केंद सरकारकडून १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. देशासह महाराष्ट्रात आणि मीरा-भाईंदर शहरात देखील काही टवाळखोर संचार बंदीचे उल्लंघन करत लोक एकत्र येऊन होम हवन करत आहेत. त्यामुळे अनेक लोक घरात बसावे लागत आहे. घरात बसण्यासाठी लोकांमध्ये जणजागृती करण्यात येत आहे. तरीही काहीजण पोलिसाचे अभय घेऊन विधी करताना दिसत आहेत. मात्र त्या कार्यक्रम करणाऱ्यावर पोलीस कारवाई करत नसल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे.
आजूबाजूंच्या परिसरातील काही नागरीकांनी ठाणे ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती देऊनही त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे हा आजार आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लता देशमुख - स्थानिक रहिवासी
तेथील नागरिक एकमेकामध्ये अंतर ठेवून हा कार्यक्रम करत असल्याचे नवघर पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे . तसेच ही धार्मिक विधी असल्यामुळे तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
शशिकांत भोसले - उपविभागीय पोलीस अधिकारी