श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टकडून रक्तदान शिबिराचे आयोजन


बीड-  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे साहेब यांनी आवाहन केले होते त्याप्रमाणे श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट बीड जिल्हा कमिटी कडून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. येणारा काळ आपणास फार अवघड जाणार आहे. कोरना वायरस हा हळू हळू जास्त जागे वर पसरणार आहे. आपल्या देशात रक्ताचा साठा फक्त ७ दिवसाचा आहे. हा साठा जर असाच राहिला तर आपण कोरोना सोबत अधिक ताकदीने लढू शकणार नाहीत. म्हणून श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
    श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट बीड जिल्हा कमिटी लवकरच सर्व प्रशासकीय मान्यता घेऊन रक्तदान शिबीर घेणार आहोत. हे रक्तदान शिबीर घेतांना सर्व प्रकारची काळजी घेण्यात येणार आहे. फक्त ५ - ५ लोकांना या शिबीर मध्ये घेऊन रक्तदान शिबिर गर्दी न करता शिबिर पार पाडले जाईल. शिबीरामध्ये आल्यानंतर मास्क  व सेनेटायझर देण्यात येणार आहे. आपण एक समाजप्रेमी आहात समाजासाठी आपले हे पाऊल फार गरजेचे आहे. आपण या रक्तदान शिबिरात भाग घेऊ इच्छित असाल तर ९४२१७९५४५५, 98503 85952  या नंबर वर आपले नाव व मोबाईल नंबर पाठवा श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेऊन मोफत रक्ताची बॅग उपलब्ध करून देण्याची संकल्पना  ही चालूच राहील असे ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे तसेच बीड जिल्हाध्यक्ष नितीन पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.