गरज असेल तरच घराबाहेर पडा
मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या आजारामुळे जगभरात ११ हजारापेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. चीन आणि इटली या दोन देशात सहा हजारापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. १७० देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूच्या आवरणाखाली २.५ लाखाहून अधिक लोक आले आहेत. हा विषाणूची लागण भारतातही मोठ्या झपाट्याने पसरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात उद्या जनता कर्फ्यू घोषित केला आहे. नेते, अभिनेते जनतेला घरीच राहण्याचे व गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन करीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी देखील जनतेला गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका असे आवाहन केले आहे.