मिरा भाईंदर मध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त. जिल्ह्याच्या सीमा बंद

मिरा भाईंदर मध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त.
जिल्ह्याच्या सीमा बंद
मिरारोड- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केलेली असल्याने मिरा भाईंदर मध्ये व मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रवेश करणारे सर्व मार्गावर काशीमिरा येथे पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे. दहिसर चेकणाका व वरसावे येथे जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत.
        मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी बॅरिगेट लावण्यात आलेले आहेत. मुंबईकडून भाईंदर कडे जाणारे मार्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच मिरा भाईंदर कडून बाहरे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. सर्व नाक्या - नाक्यावर पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आपात्कालीन व अत्यावश्यक कामासाठी जे घरातून बाहेर पडत आहे फक्त त्यांना जाण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे. 
 संचारबंदी सोबतच जिल्हा सीमा बंदीही लागू केल्यामुळे पोलिसांनी दहिसर चेकनाका व वरसावे  येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने वाढती खबरदारी म्हणून राज्यात कालपासून संचारबंदी लावत फौजदारी संहितेचे कलम १४४ लागू केले आहे त्यासोबतच जिल्हा सीमा बंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे मुंबई व ठाणे जिल्ह्याची सीमा असलेले मुंबईचे मुख्यप्रवेशद्वार असलेला दहिसर चेकणाका येथे काशीमिरा पोलीस व वाहतूक पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवून कसून तपासणी करीत अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर बाकी सर्व वाहनांना बंदी केलेली आहे जर कोणाचे अत्यावश्यक कारण असल्यास पोलीस सोडत त्यांना ठाणे जिल्ह्यात व मुंबई जिल्ह्यात सोडत आहेत अन्यथा काही क्षुल्लक कारण असल्यास त्यांना परत पाठवत आहेत. अशी माहिती 
मंगेश कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा काशीमिरा यांनी दिली आहे.