पाटोदा नगरपंचायत आरोग्य सभापती राजू जाधव यांचा अभिनव उपक्रम
पाटोदा - पाटोदा नगरपंचायत आरोग्य सभापती राजू जाधव यांचा अभिनव उपक्रम घरोघरी जाऊन कोरोना विषय जनजागृती करून मोफत मास्कचे वाटप केले आहे.
पाटोदा नगरपंचायतचे आरोग्य सभापती राजू जाधव यांनी वार्ड क्रमांक ११ मध्ये सकाळी घरोघरी जाऊन कोरोना विषयी जनजागृती करून हा आजार किती भयंकर आहे. याची माहिती सांगून कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे व काय करु नये याची घरोघरी जाऊन माहिती सांगितली. खोकला,ताप श्वासोच्छव घेण्यास अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार घ्या कोरोना पासून सावधान राहण्यासाठी साबण व पाणी वापरुन हात स्वच्छ धुवा, शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा,सर्दी किंवा फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा, मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्या, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा रोजच्या वापराची कपडे गरम पाण्याने धुवावे,अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडावे नाही तर घरात बसून रहावे. स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवा ताप, खोकला श्वासोच्छवासात अडथळा लक्षणे आढळून आल्यास काळजी घ्या उपचारासाठी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आव्हान आरोग्य सभापती राजू जाधव, यांनी केले आहे.