सांगली, इस्लामपुरातुन २३ जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना ?

सांगली, इस्लामपुरातुन २३ जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना ?


मुंबई- कोरोना या महामारी रोगाने संपूर्ण जगात 
थैमान घातले आहे. जगासमोर एवढे मोठे संकट उभे राहिले आहे. हे संकट टाळण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे यात वाढ होताना दिसत आहे. अशीच घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरातील एकाच कुटुंबातील २३ व्यक्तीना कोरोनाची लागन झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 
     कोरोनाची साखळी असते तरी कशी ? कोरोना कसा फैलावत जातो ? हे सांगलीचे उदाहरण सगळ्यांसमोर आले आहे. बेफीकीर वागण्याचा परिणाम काय होतो. याची सविस्तर  पुर्ण माहिती या लेखाद्वारे वाचा. इस्लामपूरचे चार जण सौदी अरेबियाला धार्मिक यात्रेसाठी हजला गेले होते. १३ मार्चला सर्वजण भारतात परतले. विमानतळावर आले तेव्हा त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. तरीही त्या चौघांच्या हातावर शिक्के मारून घरीच राहण्यास सांगण्यात आले. ते चौघेजण मुंबईतून कारने इस्लामपूरला घरी पोहचल्यानंतर त्यांनी कोणत्याही व्यक्तीला किंवा पाहुणे , नातलगांना भेटने अपेक्षित नव्हते परंतु त्यांनी पाहुण्यांना संपर्क साधला. हज वरून परत आल्याचा खुशीत सर्वांना आमंत्रण देऊन जेवणाचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमासाठी अनेक नातलग आले होते. त्यानंतर ते चौघेही जण कुटुंबीयांच्या संपर्कात आले. पाहुणे त्यांना भेटायला गेले. ते जसे लोकांना भेटले तसा कोरोनाही पसरत गेला. कोरोनाची साखळी कशी असते याचं हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
   १३ तारखेला सौदी अरेबियातून परतल्यानंतर १४ पासून घरी होते. याच काळात अनेक जण त्यांना भेटायला आले आणि भेटले. १९ मार्चला त्यांना त्रास जाणवू लागला आणि कोरोनाची लक्षणं दिसू लागली. २१ तारखेला त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि २२ तारखेला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
या चौघांच्या माध्यमातून सांगलीत कोरोना पोहचला. या चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मग धावपळ सुरु झाली. त्यांच्या संपर्कात असलेल्या ५ जणांची तपासणी करण्यात आली आणि तीही पॉझिटिव्ह आली. मग या सगळ्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी तिघांची तपासणी करण्यात आली. ती देखिल पॉझिटिव्ह आली. ही साखळी मग पुढे सुरुच राहिली. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी १२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यांचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली. पाहता पाहता सहा दिवसांत सांगलीतल्या कोरोना रुग्णांची संख्या ४ वरून २३ वर पोहचली.
चौघांना जसजसे लोक भेटत गेले तसा कोरोनाचा फैलाव होत गेला. या चौघांना भेटायला कोल्हापूरच्या वडगावमधून एक नातेवाईक गेली होती. तिचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली.
होम क्वारंटाईनमध्ये असताना या चौघांना कुणीही भेटणं अपेक्षित नव्हतं. पण दिलेली सूचना पाळली नाही त्यामुळे कोरोना फैलावत गेला. कोरोना कसा फैलावतो यासाठी ग्राफिक्स आणि डॉक्टरांकडून उदाहरणं दिली जातात. पण सांगलीचं उदाहरण कोरोनाची साखळी कशी असते आणि निष्काळजीपणा कसा भोवू शकतो हे दाखवून देणारं आहे.
हा व्हायरस आपल्या दारात येत नाही
तो पर्यंत याची दाहकता लोकानां समजणार
नाही. हे समजेपर्यंत खुप उशीर झालेला असेल.
गमंत मस्करी सोडा जागरुक व्हा. सर्वांना हात जोडुन विनंती आहे त्यांनी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे व शासन हे आपल्यासाठीच प्रयत्न करत आहे. त्यामुळे सर्वांनी आपली काळजी घ्यावी व अपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी करावी.