कोरोना' संकटामुळे देशभरात टोलवसुली बंद, नितीन गडकरींकडून मोठा दिलासा

 


कोरोना' संकटामुळे देशभरात टोलवसुली बंद,


 नितीन गडकरींकडून मोठा दिलासा


मुंबई- कोरोना’च्या संकटामुळे देशभरात टोलवसुलीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही दिलासादायक घोषणा केली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात देशभरातील सर्व टोलनाके बंद राहतील. 
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना विलंब होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनपर्यंत म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत देशात कुठल्याही टोलनाक्यावर टोलवसुली होणार नाही. तातडीच्या सेवा किंवा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी वाहने अडथळ्याविना जावीत, यासाठी देशभरातली टोलवसुली रद्द करण्यात आली आहे. ‘रस्त्यांची देखभाल आणि टोल नाक्यांवर आपत्कालीन स्रोतांची उपलब्धता नेहमीप्रमाणे सुरु राहील’ असे गडकरी यांनी सांगितले आहे.