कोरोना व्हायरसपासून स्वतः काळजी व इतरांना सुरक्षित ठेवा - अविनाश पवार

कोरोना व्हायरसपासून स्वतः काळजी व इतरांना सुरक्षित ठेवा - अविनाश पवार 


प्रशासनास सहकार्य करा


पाटोदा ( हरिदास शेलार ) -  : कोरोना व्हायरसने अवघ्या जगाला विळखा घातल्याचे चित्र निर्माण झाले आहे . त्याअनुषंगाने देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये याकरिता सरकारने योग्य ती खबरादारी घेतलेली आहे . त्यामुळे नागरीकांनी घाबरून जावू नये . त्याकरिता कोरोना व्हायरसपासून स्वतःसहीत इतरांना सरक्षित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे आणि १४४ कलमाचे पालन करावे . एवढेच नाही तर कोरोना व्हायरसला हद्दपार करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे , असे आवाहन युवा नेते अविनाश पवार यांनी केले आहे . 
     कोरोना व्हायरस हद्दपार करण्यासाठी नागरीकांनी घाबरून न जाता काळजी घेतली पाहिजे . जिल्ह्यात २१ दिवस लॉकडाऊन लागु करण्यात आला आहे . त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये , आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा . कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका . कोरोना व्हायरस रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार , पोलीस अधीक्षक हर्ष पोदार , सीईओ अजित कुंभार , सीएस डॉ . अशोक थोरात यांनी संपूर्ण यंत्रणा कामाला लावलेली आहे . त्याअनुषंगाने त्यांनी वेगवेगळे नियम लागू केले आहेत . त्यांच्या या आदेशांचे आणि नियमांचे नागरीकांनी उल्लघन करू नये . कारण त्यांनी उचललेली पावले ही आपल्या सर्वांसाठीच्या आरोग्यासाठी आहेत . कोरोना व्हायरसच्या प्रतिबंध व उपचारासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे . त्यामुळे नागरीकांनी होईल तेवढी काळजी घेतली पाहिजे . असे आवाहन युवा नेते अविनाश पवार यांनी केले आहे .