मागाठाणे बेस्ट आगारात मास्कचे वाटप

मागाठाणे बेस्ट आगारात मास्कचे वाटप


बोरिवली-  जगात सर्व देशावर व आपल्या भारत देशावर सुद्धा कोरोना व्हायरस चे संकट  घोंघावत आहे. याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेसाठी भाजपाचे नगरसेवक अनिल भोसले यांनी बेस्ट च्या  मागाठाणे आगार येथे  सर्व चालक , वाहक यांना मास्कचे वाटप करण्यात आले. 
   कोरोना व्हायरस चा सामना करण्यासाठी व आपल्या भारत देशाचे  पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी  यांनी दिनांक २२ मार्च रोजी रविवारी  सकाळी ७ ते रात्री  ९ हया वेळी  करफूचे आव्हान केले आहे. त्याचा एक भाग म्हणून व मुंबई दुसरी रक्त वाहीनी समजली जाणारी बेस्ट  व बेस्ट कर्मचाऱ्यांच्या  आरोग्याची  काळजी  घेण्यासाठी  मीरा भाईदर महानगर पालिकेचे नगरसेवक व मा. सभापती अनिलजी भोसले  यांनी आपल्या  स्वतःच्या खर्चाने मागाठाणे आगाराचे अधिकारी वर्ग , आगार व्यवस्थापक   सिकरे , वरीष्ठ वाहतूक अधिकारी कुलदीप सिंग आगार अधिकारी दिपक पाटील  व कर्मचारी  ज्ञानोबा मोगले, दादासाहेब  काशीद, जालिंदर शिंदे ,प्रविन ठोकळ ,सहदेव पवार व ईतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांतून  मास्क चे वाटप करण्यात आले.  बेस्ट चे अधिकारी वर्ग व मा नगरसेवक व मा सभापती श्री मा आनिलजी भोसले साहेब यांनी माणूसकीच्या नात्यातून व आरोग्याची काळजी घेण्याच्या भावनेतून आपल्या पासून सुरुवात केली पाहिजे  हीच एकमेव भावना दिसून आली.