पाडव्याला होणारी दासखेड येथील बाजीबाबाची यात्रा रद्द  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान कमिटीचा निर्णय जाहिर

पाडव्याला होणारी दासखेड येथील बाजीबाबाची यात्रा रद्द 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान कमिटीचा निर्णय जाहिर


बीड  - (जिल्हा प्रतिनिधी ) हरिदास शेलार
पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र दासखेड येथील गुढी पाडव्याच्या अमावस्येला होणारी श्री बाजीबाबा देवस्थानची वार्षिक यात्रा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय येथील देवस्थान कमिटीच्या वतीने घेण्यात आला असून वर्षातील सर्वात मोठी समजली जाणारी ही यात्रा कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेवून रद्द करण्यात आली आहे . या बाबत अधिक माहिती अशी की , सध्या राज्यासह सर्वत्र कोरोना विषाणू व्हायरसने हाहाकार माजवला असून दिवसेंदिवस कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णात वाढ होताना दिसून येत आहे . देशात राज्यात सवत्र याची दखल घेवून संसर्ग प्रतिबंधात्मक आणि खबरदारीची उपाय योजना करण्यात आली आहे . आठवडी बाजार , मेळावे , लग्नसमारंभ , या बरोबरच विविध देवस्थानच्या यात्रा भरवण्यात येवू नयेत म्हणून प्रशासनाने सख्त आदेश पारीत केले आहेत . दासखेड येथील श्री बाजीबाबाचे देवस्थानही असेच भक्तप्रिय असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन लोक या देवस्थानला यात्रे निमित्त येत असतात . दिवाळीचा पाडवा आणि गुढी पाडवा या दोन दिवशी बाजीबाबाची मोठी यात्रा भरत असते . आगामी दोन तीन दिवसावर गुढीपाडवा येत असून येथिल वार्षिक यात्रा मोठया प्रमाणात भरत असते . मात्र कोरोनाचा वाढता धोका आणि यात्रेकरूंची वाढती गर्दी लक्षात घेवून देवस्थान कमिटीने या वर्षीची यात्रा न भरवण्याचा निर्णय घेवून यात्रा रद्द करण्यात आल्याचे जाहिर केले आहे . रोग प्रसाराला प्रतिबंध करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला गेला असून नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे , भयानक विषाणूच्या संसर्गाला कोणी बळी पडू नये , प्रत्येकाने आपल्या आरोग्याला अबाधित ठेवावे आणि प्रशासनाच्या उपाय योजनांना एक बांधिलकी या नात्याने सहकार्य करावे असे मत देवस्थान समितीने व्यक्त केले आहे . या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी येवू नये यात्रा रद्द करण्यात आली आहे . असे ही शेवटी पत्रकात नमुद केले आहे .