पोलीस अधिकाऱ्याने रस्त्यावरील नागरिकांना जेवण वाटप करून केला मदतीचा हात पुढे
भाईंदर- कोरोना मुळे संपूर्ण जग संकटात सापडले आहे. महामारी रोगाच्या संदर्भात पूर्ण देशात लॉक डाऊन केलेले असल्यामुळे रस्त्यावर भीक मागणाऱ्या , ज्यांचे हातावर पोट आहे. दररोज कमावणे व पोट भरणे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे यांना मदतीशिवाय पर्याय नाही. असाच माणुसकीचा हात म्हणून काशीमीरा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील यांनी या रस्त्यावर जगणाऱ्यांना मदतीचा हात पुढे करत पाणी व जेवण दिले आहे.
मीरा भाईंदर वाहतूक विभागाचे मुख्य पोलीस अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये पेट्रोलिंग साठी नियुक्त केलेले पीएसआय सुधीर पाटील त्यांचे कर्मचारी धनगर आणि इतर सहकारी मिळून शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना रस्त्यावर भीक मागून आपली उपजीविका जगणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. असेच रस्त्यावर अन्न पाण्याविना अनेक जण आहेत. हे सुधीर पाटील यांच्या निदर्शनास आले. हे पाहून त्यांचे मन सुन्न झाले व पाटील यांनी ५० ते ६० लोकांना पाणी बॉटल व बिर्याणीचे पाकीट इत्यादीची वाटप करून रस्त्यावरच्या लोकांची भूक भागवण्याचे काम केले आहे. पोलीस कारवाई करतात म्हणून नेहमीच लोक त्यांच्या नावाने बोंब मारतात. परंतु त्यांनाही माणुसकी आहे. कारवाई करण्याची त्यांचीही इच्छा नसते. कायदा पाळत नसल्यामुळे त्यांना कारवाई करणे भाग पडते.या कामाची प्रशासनाने आणि लोकांनी दखल घेतली पाहिजे. मीरा-भाईंदर शहरांमध्ये अशा वेगवेगळ्या कामासाठी काशिमिरा वाहतूक विभाग नेहमीच आपले नाव लौकिक करत आहे.